Steve Jobs
(Autor) Walter Isaacsonस्टीव्ह जॉब्झच्या संपूर्ण सहकार्यानं लिहिलेलं अधिकृत चरित्र. स्टीव्ह जॉब्झचं वॉल्टर आयझॅक्सननी लिहिलेलं अधिकृत चरित्र. दोन वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या स्टीव्ह जॉब्झच्या चाळीसहून अधिक मुलाखतींवर आधारित. - त्याचबरोबर शंभरहून अधिक कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, सल्लागार, प्रतिस्पर्धक आणि सहकारी यांच्याही मुलाखती - असं हे पुस्तक एका उन्मेषपूर्ण व्यावसायिकाच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचा प्रचंड वेगाने वर-खाली होत असलेला 'रोलरकोस्टर' आलेख सांगते, ज्याच्या पूर्णत्वाच्या उत्कटतेने आणि महत्त्वाकांक्षेने सहा उद्योगांमध्ये क्रांती आणली पर्सनल कम्प्यूटर्स, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्यूटर्स आणि डिजिटल प्रकाशन व्यवसाय. २१ व्या शतकात कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे, हे त्यानं ओळखलं आणि म्हणूनच कल्पकतेची भरारी आणि तंत्रज्ञानाची विलक्षण शक्ती यांचा मिलाफ असलेली 'अॅपल' नामक कंपनी उभी करून जॉब्झ जणू सृजनशील आणि व्यावहारिक कल्पकतेचं मूर्तिमंत उदाहरणच ठरला. स्टीव्ह जॉब्झनी जरी या पुस्तकासाठी सहकार्य केलं असलं तरी त्यानी त्यातील लिखाणावर कुठल्याही प्रकारे बंधन घातलं नाही. ''ज्यांचा अभिमान वाटू नये अशा कित्येक गोष्टी मी केल्या आहेत. परंतु माझ्या कपाटात दडवून ठेवलेलं असं काहीही नाहीये, जे बाहेर येऊ नये म्हणून मी प्रयत्न करावा, '' तो सांगतो. जॉब्झ त्याच्या सहकाऱ्यांबद्दल, प्रतिस्पर्ध्यांबद्दल मनमोकळेपणाने आणि कधीकधी अगदीच स्पष्टपणे बोलतो. त्याप्रमाणेच त्याचे मित्र, शत्रू आणि सहकारीसुद्धा त्याचा झपाटलेपणा, त्याचे दोष, परिपूर्णतेचा ध्यास, त्याच्या इच्छा-आकांक्षा, कला, मोहकता आणि त्याचा नियंत्रणाचा हट्ट, ज्यानी त्
Walter Isaacson
Walter Seff Isaacson (born May 20, 1952) is an American author, journalist, and professor. He has been the president and CEO of the Aspen Institute, a nonpartisan policy studies organization based in Washington, D.C., the chair and CEO of CNN, and the editor of Time.